विरह संपला
अतूट त्या साखळ्या निखळल्या अंतरी
खूण ही पटली मनाला ती तूच आहे खरी
पळालो, थांबलो तुला मी का दिसेना
भांबावलो,थकलो परी मन काही भरेना।
मी गुंतलो, गुरफटलो कशाचे हे धागे
तुटता तुटेना, सुटता सुटेना कोडे हे माझे
भावनांचे बंध हे बांधती माझ्या मना
अश्रूंचे तलम तंतू अडविती वेदना।
विरह हा संपला तरी वसंत का फुलेना
हास्य उमटले जरी का न उमटती भावना
दूर मी होतो तरी किंतु हा नसावा
का तुझ्या डोळयांत मला अनोळखीपणा दिसावा?
(क्रमशः)
©2026, मंदार कुळकर्णी
First published on Instagram,2021 @ maziya_angani
येथे प्रस्तुत करत आहे एक कथा. जी चार कवितांच्या रूपात लिहिली आहे. हा संवाद आहे दोन प्रेमी जीवांचा…तशी ही एक विरहकथा…पण दोघांच्याही नजरेतून पाहिलेली…या संवादात रूसवे आहेतच पण जसा घटनांचा क्रम समोर येतो तसा तो दुरावाही कमी होतो.
#कथ #कवत #मरठ #मरठकवत #मरठगषट #मरठबलग #Joy #Life #Marathi #Person #poem #Poetry #Search #Story #Truth
