मी शोधत बसतो…
मी शोधत बसतो.
मी शोधत बसतो, माझ्या मनातल्या एका हरवलेल्या पाखराला
ज्याला खूप उंच उडायचं होतं, गरूडापेक्षाही वर.
करायच्या होत्या त्याला ढगांशी गुजगोष्टी आणि वाऱ्याशी स्पर्धा.
पण प्रयत्नच केला नाही त्याने कधी
घरट्यातून बाहेर पडून उडण्याचा….(१)
बळ होते त्या वाघाच्या पंजात पण,
तो छोट्या शिकारींवरच समाधान मानत राहिला.
शेवटी त्याची डरकाळी विरून गेली….(२)
अजूनही तोच उत्साह त्याच्या मनात आहे..
त्या मोराला आपला पिसारा जगाला फुलवून दाखवायचा आहे पण,
आकाशात श्यामवर्णी मेघ दाटून येण्याची वाट बघत
तो नुसताच उभा आहे….(३)
©मंदार कुळकर्णी, First published on Instagram (2020)
Read on blog : thewavesofwords.wordpress.com
#कवत #मरठ #मरठकवत #Marathi #Poetry #wish