रासायनिक मूलद्रव्यांचा शोध – दमी. त्रीफोनोव, व. त्रीफोनोव (Chemical Elements How They Were Discovered In Marathi by D. N. Trifonov, V. D. Trifonov )
या पुस्तकामध्ये आपण रसायनशास्त्रातील “मुळाक्षरां “ची कशी रचना झाली, तसेच आपल्या चौकस बुद्धिमत्तेतून संशोधकांनी एकामागोमाग एकेका नव्या मूलद्रव्याचा शोध कसा लावला याचे विवेचन करणार आहोत.
बहुतेक सर्व रासायनिक मूलद्रव्यांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांची संख्या एवढी प्रचंड आहे की त्यांचे एक स्वतंत्र ग्रंथालयच होईल. त्या पुस्तकांमध्ये, मूलद्रव्यांचा अंतर्भाव असणारे खडक व खनिजे, त्यांच्या नि- एकर्षणाच्या विविध पद्धती, मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म यांचा आढावा घेतलेला असतो. काही मूलद्रव्ये आश्चर्य वाटण्याएवढी मुबलक आहेत. त्यांचे उपयोगही अनपेक्षित वाटावेत एवढ्या भिन्नभिन्न क्षेत्रात केलेले आढळतील. खरे तर आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात प्रत्येक मूलद्रव्याचा काहीना काहीतरी महत्त्वपूर्ण उपयोग आहेच आहे असेच दिसेल. प्रत्येक मूलद्रव्याचे त्याचे स्वतःचे असे खास “चरित्र” असून ती सारी आपापल्या परीने वैशिष्ट्यपूर्णही आहेत हे खरे की मूलद्रव्यांच्या शोधांच्या इतिहासाबाबत अद्यापीही बरीच संदिग्धता आहे व इतिहासकारांना न सुटलेले प्रश्न अजूनही सोडविता आलेले नाहीत. कुणी सांगावे, त्यांच्यापैकी एखादा- दुसरा इतिहासकार तुम्हीही असू शकाल !
अनुवाद : राजेंद्र सहस्रबुद्धे
You can get the book here and here
Follow us on
Twitter https://x.com/MirTitles
Mastadon https://mastodon.social/@mirtitles
Bluesky https://bsky.app/profile/mirtitles.bsky.social
Tumblr https://www.tumblr.com/mirtitles
Internet Archive https://archive.org/details/mir-titles
Fork us on gitlab https://gitlab.com/mirtitles
#आवरतसरण #घटकचशध #रसयनशसतर #रसयनशसतरचइतहस #रसयनककरत #लकपरयवजञन #वजञनचइतहस #वजञनकशध #सवहएतसहतय #chemical #chemicalRevolution #chemistry #discoveryOfElements #historyOfChemistry #historyOfScience #periodicTable #popularScience #scientificDiscovery #sovietLiterature